नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची कारला जोरदार धडक

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता नरे येथील सेल्फी पॉइंट जवळ कंटेनर आणि कारचा अपघात झाला आहे. वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Fri, 5 May 2023
  • 01:30 pm
नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची कारला जोरदार धडक

नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची कारला जोरदार धडक

अपघातात कारमधील एक प्रवासी जखमी

पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता नरे येथील सेल्फी पॉइंट जवळ कंटेनर आणि कारचा अपघात झाला आहे. वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

नवले पुल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सतत अपघात घडत आहेत. प्रशासनाकडून हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला आहे. तसेच अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात येथे उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. तरीही या परिसरातील अपघाताचे सत्र मात्र काही केल्या थांबायला तयार नाही. महामार्गावर हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या.

सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली आहे. या अपघातात जीवीतहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest