पुण्यातील खोदकामामुळे सुमारे ४३ हजार झाडांचे नुकसान – अहवाल

पुणे शहरातील रस्ते खोदाई आणि काँक्रिटीकरणामुळे सुमारे ४३ हजार झाडांचे नुकसान झाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे महापालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणातील अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 15 Jun 2023
  • 05:07 pm
पुण्यातील खोदकामामुळे सुमारे ४३ हजार झाडांचे नुकसान – अहवाल

पुण्यातील खोदकामामुळे सुमारे ४३ हजार झाडांचे नुकसान – अहवाल

दोन वर्षानंतर झाडे कुजण्याची शक्यता

पुणे शहरातील रस्ते खोदाई आणि काँक्रिटीकरणामुळे सुमारे ४३ हजार झाडांचे नुकसान झाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे महापालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणातील अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुण्यात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त झाडे आहेत. तथापि, झाडांच्या आजूबाजूला होत असलेल्या रस्ते खोदाई आणि काँक्रिटीकरणामुळे शहराच्या हिरवळीवर परिणाम होत आहे. केबल टाकणे, पाणी आणि ड्रेनेज लाईन आणि इतर सेवांचा समावेश असलेल्या रस्त्यांच्या खोदकामात झाडांच्या मुळांना इजा होत आहे.

मात्र, सध्या झाडांचे झालेले हे नुकसान दिसून येत नसले तरी पुढील एक-दोन वर्षात झाडे कुजण्यास सुरुवात होण्याची आहे. कारण, काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे झाडांमध्‍ये पाणी शिरू शकते. त्यामुळे झाडांच्या मुळ्या कुचण्यास सुरूवात होऊ शकते. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर झाडांचे नुकसान होत असल्याने रहिवाशांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest