पुण्यात घरगुती वादातून तरुणाची आत्महत्या
पुण्यात घरगुती वादातून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडकवासला धरणात उडी घेऊन या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. आज (गुरूवार) सकाळच्या सुमारास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मृतदेह धरणात सापडला.
स्वप्निल रामभाऊ कणसे (वय ३४, मुळ रा. लोखंडी सावरगाव ता. अंबेजोगाई जि. बीड, सध्या रा. सिद्धी हाईट्स, शिवणे, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निलचा घरात वाद झाल्यानंतर बुधवारी दुपारी घरातून निधून गेला होता. मात्र, संध्याकाळी तो घरी परतला नाही. स्वप्निल घरी न आल्याने त्याच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
मात्र आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाच्या अकरा नंबर मोरी जवळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तात्काळ अधिकाऱ्यांनी जवानांच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला. या प्रकरणाचा अधिक तपास हवेली पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.