भरधाव दुचाकी टेम्पोवर धडकली, तरुणाचा जागीच मृत्यू

भरधाव दुचाकीचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 19 Jun 2023
  • 11:52 am
Accident : भरधाव दुचाकी टेम्पोवर धडकली, तरुणाचा जागीच मृत्यू

भरधाव दुचाकी टेम्पोवर धडकली, तरुणाचा जागीच मृत्यू

थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

 

भरधाव दुचाकीचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुण्यातील सहकारनगरमध्ये झाला आहे.

युवराज अशोक कोंढारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार युवराज हा सहकारनगरमधून मध्यरात्री भरधाव वेगात जात होता. यावेळी रस्त्याने समोर एक पादचारी व्यक्ती येत होती. त्याला कट मारत असताना भरधाव दुचाकीवरील युवराजचे नियंत्रण सुटले. त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर जाऊन धडकला.

या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी गाड्या आडवणाऱ्या व्यक्तीपासून बचाव करण्यासाठी युवराजचे दुचाकी भरधाव वेगात पळवल्याचे सांगण्या येत आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest