विमाननगरमधील आयटी हब इमारतीला भीषण आग

पुण्यातील विमाननगर येथील सॉलिटर बिझनेस हब या आयटी कंपनीच्या इमारतीला आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 9 May 2023
  • 03:03 pm
Vimannagar fire : विमाननगरमधील आयटी हब इमारतीला भीषण आग

Vimannagar fire : विमाननगरमधील आयटी हब इमारतीला भीषण आग

कंपनीत सुमारे २ हजार कर्मचारी करत होते काम

पुण्यातील विमाननगर येथील सॉलिटर बिझनेस हब या आयटी कंपनीच्या इमारतीला आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानगरमधील सॉलिटर बिझनेस हब या आयटी कंपनीतील बेसमेंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक रुममध्ये आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आगीचे धुर शेवटच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरले होते.

घटनेची माहिती मिळातच अग्निशमन दलाच्या ०४ गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यात सुमारे २००० कर्मचारी काम करत होते. आग लागताच त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यामुळे, कोणहीती जीविताहनी झाली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest