Contract worker injured : महापालिकेचा कंत्राटी कामगार विजेचा धक्का बसून गंभीर जखमी, दोन्ही पाय जायबंदी
गणेश विसर्जन हौदावर नेमणुकीस असलेल्या एका कामगाराला दुर्दैवाने विजेचा धक्का बसला आणि त्याचे दोन्ही लाय जायबंदी झाले आहेत. दिवा लावण्यासाठी त्याने वायर वर फेकली. ही वायर हायटेन्शन वायरला चिकटली. विजेचा प्रवाह उतरल्याने हा कर्मचारी ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सूरज रमेश खुडे असे या जखमी कामगाराचे नाव आहे. खुडे हा पुणे महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. गणेशोत्सवानिमित्त त्याची प्रभाग क्रमांक १३ मधील हॅपी कॉलनीमधील पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाच्या शेजारील गणपती विसर्जन हौदावर त्याची नेमणूक करण्यात आली होती. याठिकाणी काम करीत असताना खुडे याने प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले.
त्याने हातातील वायर वर फेकली. त्यावेळी हाय टेन्शन तारेला या वायरचा स्पर्श झाला. त्यावेळी स्पार्किंग झाले. विजेचा धक्का बसून खुडे हा ३० टक्के भाजला. तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तात्काळ भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दवाखान्यात भाजलेल्या रुग्णावर उपचार करण्याचा विभाग नसल्याने त्याला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात हलविण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.