Pune News : लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

शहरात लिफ्टमधे कोणी अडकले की, अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे याबाबत दुरध्वनी हमखास खणाणतो कारण जसे आग विझवणे हे प्रथम कर्तव्य तसे जिविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे ही पण जवानांची एक जबाबदारीच...

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Sun, 24 Sep 2023
  • 11:26 am

Pune News : लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

पुणे - शहरात लिफ्टमधे कोणी अडकले की, अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे याबाबत दुरध्वनी हमखास खणाणतो कारण जसे आग विझवणे हे प्रथम कर्तव्य तसे जिविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे ही पण जवानांची एक जबाबदारीच...

आज दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी राञी ०९•०५ वाजता दलाच्या नियंत्रण कक्षात भवानी पेठ, गुरूनानक नगर, अर्बन सॉलिटियर येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक मुलगा अडकल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून तातडीने फायरगाडी व रेस्क्यु व्हॅन रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एक लहान मुलगा (वय वर्ष ७) सहा मजली असणारया इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट बंद झाल्याने अडकला आहे. जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवत लिफ्ट रुममधे जाऊन तांञिकरित्या कार्य पार पाडत लिफ्ट पहिल्या मजल्यावर समांतर घेऊन दलाकडील स्प्रेडरचा वापर करुन लिफ्टचा दरवाजा उघडत लहान मुलाची सुमारे वीस मिनिटात सुखरुप सुटका केली. सुखरुप सुटका होताच तेथील रहिवाशांनी जवानांचे आभार मानले.  

या कामगिरीत अग्निशमन नियंत्रण कक्ष अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक अतुल मोहिते, प्रशांत मखरे, तांडेल मंगेश मिळवणे व फायरमन चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, ओंकार बोंबले, अमर दिघे, केतन नरके यांनी सहभाग घेतला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest