Police Transfer : राज्यातील ३० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या पुण्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश : पुण्याला मिळाले तीन नवे अधिकारी

राज्यातील उपायुक्त दर्जाच्या ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने सोमवारी बदल्या केला. यामध्ये पुण्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Police Transfer)

Police Transfer

राज्यातील ३० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या पुण्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश

पुणे : राज्यातील उपायुक्त दर्जाच्या ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने सोमवारी बदल्या केला. यामध्ये पुण्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Police Transfer)

पुणे शहर पोलीस (Pune Police) आयुक्तालयाच्या सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथील नागरी हक्क संरक्षण दलाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली. तर, लोहमार्ग पुणे विभागाचे अधीक्षक श्रीकांत धीवरे यांचे धुळे जिल्ह्याच्या अधीक्षकपदी वर्णी लागली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पुणे अधीक्षक दीनेश बारी यांची नागरी दहशतवादी विरोधी पथक, फोर्स वनच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, लोहमार्ग पुणे विभागाचे अतिरिक्त अधीक्षक गणेश शिंदे यांची अमरावती येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे शहर आयुक्तालयात वर्णी लागली आहे. तसेच, नाशिक ग्रामीणच्या अतिरिक्त अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांची लोहमार्ग पुणे अतिरिक्त अधीक्षकपदावर बदली झाली आहे.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या अधीक्षक तुषार जोशी यांची नियुक्ती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest