PUNE NEWS: पुण्यात बसवणार २९ लाख स्मार्ट मीटर

पुणे: राज्यातील महावितरणच्या २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर (Prepaid Smart Meter) बसवण्यात येतील. यामध्ये पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे

Electricity news

संग्रहित छायाचित्र

पुणे व पिंपरी-चिंचवडसह वेल्हे, हवेली, मुळशी, आंबेगावचा समावेश, ग्राहकांना मोफत मिळणार नवा स्मार्ट प्रीपेड मीटर

पंकज खोले
पुणे: राज्यातील महावितरणच्या २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर (Prepaid Smart Meter) बसवण्यात येतील. यामध्ये पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह वेल्हे, हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यामध्ये सुमारे २९ लाख प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. याची सुरुवात महावितरण लवकरच करणार असून, यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक चाचणीसाठी प्रीपेड मीटर बसवण्यात आले आहेत. (Latest News Pune)

स्मार्ट मीटर बसवल्यावर वीजग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशांपैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना समजेल. ग्राहकांना नवा स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत मिळणार आहे. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे. सध्याच्या पद्धतीत वीजग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठवले जाते. एखाद्या ग्राहकाने नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. पण नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीजग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येईल.

ग्राहकाला मिळणार दिलासा

ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होईल, पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसर्‍या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest