गेल्या २४ तासाच ताम्हिणी घाट परिसरात २१० मिमी पावसाची नोंद, यलो अलर्ट जारी

ताम्हिणी घाट आणि शिरगावमध्ये गेल्या २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 1 Jul 2023
  • 02:58 pm
गेल्या २४ तासाच ताम्हिणी घाट परिसरात २१० मिमी पावसाची नोंद

गेल्या २४ तासाच ताम्हिणी घाट परिसरात २१० मिमी पावसाची नोंद

पुण्यात २ आणि ३ जुलैरोजी पावसाचा जोर वाढणार

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला. यात जिल्ह्यातील घाट विभागात सर्वाधिक पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाट आणि शिरगावमध्ये गेल्या २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ताम्हिणी घाट परिसरात २१० मिमी तर शिरगाव येथे २०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच लवासा आणि लोणावळ्यातही चांगला पाऊस झाला आहे. लवासामध्ये १०५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात लोणावळ्यात ९४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यात पुढील काही दिवस आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २ आणि ३ जुलै रोजी घाट भागातील तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाट भागातील प्रवाश टाळावा, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest