Special trains
इंदोरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते इंदोर उन्हाळी विशेष १४ रेल्वे गाड्या धावणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे.
१९ मे ते ३० मे २०२३ दरम्यान या विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०९३२३ ही उन्हाळी स्पेशन रेल्वे दर शुक्रवारी सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि त्याचदिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी इंदोरला पोहोचेल.
तर गाडी क्रमांक ०९३२४ ही रेल्वे इंदोरवरून १८ मेपासून दर गुरुवारी सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ३ वाजून १० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. या गाड्यांना लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा जंक्शन, गोध्रा, रतलाम, नागदा, उज्जैन आणि देवास असे थांबे असतील. त्याचबरोबर या गाड्यांमध्ये एक फर्स्ट एसी, दोन एसी-२ टियर, १२ स्लीपर क्लास, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ जनरल सेकंड क्लास डब्बे असणार आहेत.