आज १२ वीचा निकाल जाहीर होणार, कुठे पाहाल निकाल?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर होण्यार आहे. आज दुपारी २ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 25 May 2023
  • 10:10 am

आज १२ वीचा निकाल जाहीर होणार, कुठे पाहाल निकाल?

दुपारी २ नंतर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना पाहता येणार निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर होण्यार आहे. आज दुपारी २ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. अवघ्या काही तासांत हा निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही शाखांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना दुपारी २ नंतर पाहता येईल. अधिकृत वेबसाईट्सा खालीलप्रमाणे...

mahresult.nic.in

hsc.mahresults.nic.in

hscresult.mkcl.org

यासोबतच विद्यार्थ्यांना एसएमएसव्दारेही निकाल पाहता येणार आहे. एसएमएसद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest