गेल्या २४ तासात लवासामध्ये १०७ मिमी पावसाची नोंद, घाट भागात अतिवृष्टीचा इशारा

गेल्या २४ तासात लवासामध्ये १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर निमगिरीमध्ये ३५.५ मिमी, लोणावळामध्ये ३५ मिमी, पाषाणमध्ये १६.५ मिमी, शिवाजीनगरमध्ये १५ मिमी, वडगावशेरीमध्ये १४ मिमी, हडपसरमध्ये १० मिमी तर तळेगावमध्ये १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 28 Jun 2023
  • 10:39 am
 rain update : गेल्या २४ तासात लवासामध्ये १०७ मिमी पावसाची नोंद, घाट भागात अतिवृष्टीचा इशारा

गेल्या २४ तासात लवासामध्ये १०७ मिमी पावसाची नोंद

पुणे शहरासाठी यलो अलर्ट जारी

पुणे, नाशिक सातारच्या घाट भागात ३० जूनपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. घाटातील धोकादायक झोनमध्ये प्रवास टाळावा. तसेच पुणे-मुंबई प्रवासादरम्यान घाटातून जाताना वाहन चालवताना खबरदारी घ्यावी, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात लवासामध्ये १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर निमगिरीमध्ये ३५.५ मिमी, लोणावळामध्ये ३५ मिमी, पाषाणमध्ये १६.५ मिमी, शिवाजीनगरमध्ये १५ मिमी, वडगावशेरीमध्ये १४ मिमी, हडपसरमध्ये १० मिमी तर तळेगावमध्ये १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहरात पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. यामुळे रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसात लगतच्या घाट भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण घाट भागात अतिमुसळधार पावसासोबतच सोसाट्याचे वारे ३० ते ३५ किमी प्रतितासाने वाहतील. यामुळे झाडे देखील उन्मळून पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest