संग्रहित छायाचित्र
पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ (Pimpri railway station) एका 35 वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (31 ऑक्टोबर) रात्री पिंपरी रेखी मीटर 177 /33 जवळ झाला. (Pimpri Chinchwad News)
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्यातरी धावत्या रेल्वेची धडक बसल्याने तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. अद्याप मृताची ओळख पटली नसून, त्याची उंची 5.5 फूट, रंग सावळा, अंगामध्ये ब्लॅक रंगाचे टी-शर्ट त्यावर Black असे पांढऱ्या रंगाने लिहिले आहे.
तर निळ्या रंगाची पॅन्ट, चॉकलेटी रंगाचे अतंरवस्त्र असे मृताचे वर्णन आहे. ओळख पटल्यास पिंपरी रेल्वे पोलीस हवलदार पाटील यांच्याशी 8888895266 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.