संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिपाई कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगानुसारच्या श्रेणी वेतन (ग्रेड पे) लक्षात न घेता सातव्या वेतन आयोगात श्रेणी वेतन लागू करण्यात आले होते. त्यामुळे वेतनात तफावत निर्माण झाल्याने शिपाई कर्मचार्यांत असंतोष निर्माण झाला होता. विसंगत श्रेणी वेतनामध्ये सुधारणा करून शिपाई कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन निश्चित केल्याने कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
महापालिकेत शिपाई कर्मचार्यांना एकाऐकी पद असल्याने सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाच्या पद नसल्यामुळे वेतन कमी झाले होते. शिपायांना सहाव्या वेतन आयोगामध्ये श्रेणी वेतन १ हजार ९०० रूपये, शिपाई पदाला व नाईक पदाला दोन हजार रूपये व पुढील पदासाठी दोन हजार ४०० रूपये श्रेणी वेतन होते. सातव्या आयोगामध्ये शिपाई पदाला एक हजार ३०० ते एक हजार ७०० रूपये असल्याने शिपायांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. सातव्या वेतन आयोगामध्ये सहाव्या वेतन आयोगाचा श्रेणी वेतन गृहीत धरून वेतन निश्चिती करण्यात आली नव्हती. सातव्या वेतन आयोगामध्ये कमी श्रेणी वेतन केल्यामुळे वेतनामध्ये तफावत निर्माण झाली होती.
महाराष्ट्र शासनाच्या निमावलीमध्ये १२ मार्च २०२४ ला शिपाई, नाईक, हवालदार व जमादार याचीं वेतन निश्चिती करून शासनामार्फत आदेश काढण्यात आला आहे. महापालिकेच्या लेखा विभागाकडून त्याबाबत ११ डिसेंबर २०२४ ला आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शिपायांना पदोन्नती मिळणार असून, वेतनात मोठी वाढ होणार आहे, त्यामुळे शिपाई कर्मचार्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे, अशी माहिती कर्मचारी अजय भोसले यांनी दिली. या संदर्भात महापालिकेचे कर्मचारी नागेशराव जाधव, भिमा निकाळजे, अविनाश वाघेरे, रवी वाघेरे, संजय मेढेकर, मोहन फुगे, दिनगर खर्चे, सखाराम घुले, प्रशांत पाडाळे, अजय भोसले, नरेश शेडगे यांनी राज्य शासन व महापालिकास्तरावर पाठपुरावा केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.