संग्रहित छायाचित्र
चिखली : गांजा विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून ५२६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १७) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे करण्यात आली.प्रिन्स अमरपाल मौर्य (वय २२, रा. चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी चिखली रोडवर एक तरुण दुचाकीवरून संशयितरित्या जात असताना अमली पदार्थ विरोधी पथकाला आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५२६ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी गांजा, दुचाकी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ८६ हजार ८८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.