कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
चाकण : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (२६ फेब्रुवारी) मेदनकरवाडी, चाकण येथे घडला आहे. या प्रकरणी धनाजी आत्माराम चव्हाण (वय ४४, रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस (chakan police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून पोलिसांनी कंटेनर चालक बेनाथ सुरतराम जाट (वय ३०, रा. बोराडा, राजस्थान) याला अटक केली आहे. या अपघातात राणी दीपक गोसावी (वय ४०, रा. मेदनकरवाडी) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यातील कंटेनर घेऊन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वेगाने कंटेनर चालवत होता. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या गोसावी यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. यात गोसावी खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.