संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: मी कलाकार आहे.. माझी जी कला आहे, त्याच्यात माझा जम आहे. राजकारण ही माझी वृत्ती नाही. माझे ते क्षेत्र नाही असे सांगणाऱ्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिला भाजप कडून ऑफर आहे का असे पत्रकारांनी विचारले असता "हे मी तुम्हाला कशाला सांगू" असे म्हणत माधुरीने याबाबत अधिक बोलणे टाळले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातून भाजपा काही अभिनेते, अभिनेत्री यांना लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील एका जागेवर माधुरी दीक्षितला निवडणुकीत उतरविण्यात येणार असल्याचे सांगितले जात असतानाच, पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्या करिता माधुरी आली असता तिने पत्रकारांशी बोलताना कला क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात येण्याची इच्छा आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता माधुरी दीक्षित म्हणाली, याबाबत मला खूपवेळा विचारले जाते. मी एक कलाकार आहे. कला हे माझे क्षेत्र आहे. त्यात मला रस आहे. राजकारण माझे क्षेत्र नाही. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का, असे विचारले असता ‘मी ते तुम्हाला का सांगू’ असे म्हणत माधुरी दीक्षितने निवडणूक लढविण्याबाबतची गुप्तता कायम ठेवली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.