संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, देहू - आळंदी रस्ता बोऱ्हाडेवाडी, चक्रपाणी वसाहत, अक्षयनगर तसेच इंद्रायणीनगर या भागात आज दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री होणारा पाणीपुरवठा व उद्या दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत निघोजे बंधाऱ्यावरून उचलल्या जाणाऱ्या अशुद्ध जलउपसा केंद्रावरील विद्युत पुरवठा ७ ऑगस्ट २०२४ च्या मध्यरात्री अडीच वाजलेपासून बंद असल्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद झालेला आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी तसेच देहू - आळंदी रस्ता बोऱ्हाडेवाडी, चक्रपाणी वसाहत, अक्षयनगर, इंद्रायणीनगर या भागातील आज दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी मध्य रात्री होणारा पाणीपुरवठा व उद्या दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. तरी दक्षतेची खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.