पिंपरी-चिंचवड : दापोडीतील उद्यानात दुरवस्थांचा 'खेळ'

महापालिकेच्या दापोडी येथील तथागत भगवान गौतम बुध्द उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानामधील लहान मुलांची खेळणी व बसण्यासाठी असणारी काही बाकेही तुटली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.

Dapodi park

पिंपरी-चिंचवड : दापोडीतील उद्यानात दुरवस्थांचा 'खेळ'

भगवान गौतम बुध्द उद्यानात अस्वच्छ स्वच्छतागृहे, जागोजागी कचरा, झाडांकडे दुर्लक्ष अन् तुटकी खेळणी

महापालिकेच्या दापोडी येथील तथागत भगवान गौतम बुध्द उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानामधील लहान मुलांची खेळणी व बसण्यासाठी असणारी काही बाकेही तुटली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.

उद्यानातील पुरेशा देखभालीअभावी झाडे सुकू लागली आहेत. सर्वत्र गवत उगवले असून मैदानात झुडपे तयार झाली असून खेळणी तुटली आहेत. त्याचप्रमाणे जागोजागी कचरा पसरला आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या अबालवृध्दासह नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात उद्यानाची संख्या सर्वाधिक आहे. काही उद्याने सोडल्यास अनेक लहान सहान उद्यानांकडे पालिका उद्यान विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक उद्यानांना अवकळा आली आहे. अशीच अवस्था दापोडीतील तथागत भगवान गौतम बुध्द उद्यानाची झाली आहे.  हे उद्यान दापोडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांच्या विरंगुळ्यास उपयुक्त ठरत आहे. सध्यस्थिती उद्यानाची झालेली दुरावस्था पाहून नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.  

उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. झोके नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे खेळण्यास येणाऱ्या लहान मुलांचा हिरमोड होत आहे. मैदानावर गवत, झुडपे उगवली आहेत. त्याच ठिकाणी सांडपाणी डबक्यात साचत आहे. त्या पाण्याने दुर्गंधी सुटली आहे. त्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन सायंकाळी नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास होत आहे.  उद्यानात जागोजागी कचरा पसरल्याचे दिसत आहे. उद्यानाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांकडून काहीच कामे होताना दिसत नाहीत. उद्यानाची योग्य देखभाल दुरुस्ती होत नसल्याने दिसून येत आहे.

खेळणी तुटली, मुलांच्या जीवितास धोका

तथागत भगवान गौतम बुध्द उद्यानात महापालिकेने बसवलेली सर्व खेळणी पूर्ण तुटलेली आहेत, तर लहान मुलांना खेळण्यासाठी बसवलेले काही साहित्य मोडकळीस आलेले आहे. उद्यानात लहान मुले-मुली खेळण्यास येतात. कुतूहलापोटी एखादे लहान मूल त्या खेळण्याच्या साहित्यावर पडल्यास त्याला इजा होऊ शकते. हाता-पायाला देखील जखमा होऊ शकतात.  त्याचप्रमाणे अनेक साहित्य हे अडगळीत पडलेले आहे. 

तथागत भगवान गौतम बुध्द उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. उद्यानात दररोज लहान मुले उद्यानात खेळण्यास येत असतात. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही फिरण्यास येत असतात. पण, उद्यानातील तुटलेली खेळणी, अस्वच्छता, वाढलेले गवत आणि सुकलेली झाडे पाहून नागरिकांसह लहान मुलांचा हिरमोड होतोय. त्यामुळे उद्यानातील खेळणी तत्काळ बदलण्यात यावी. मैदानाची झालेली दुरवस्था दूर करावी.

- निलेश हाके,  सामाजिक कार्यकर्ता

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest