CIVIC MIRROR IMPACT : वाकड-हिंजवडी रस्त्यावर बसवले पथदिवे; 'सीविक मिरर'च्या वृत्ताची पालिका प्रशासनाकडून दखल

वाकड-हिंजवडी लिंक रोडवर रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अंधारामुळे पहाटेच्या वेळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसह महिलांना असुरक्षित वाटत होते, तसेच सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 3 Dec 2024
  • 06:15 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

वाकड-हिंजवडी रस्त्यावर बसवले पथदिवे

वाकड-हिंजवडी लिंक रोडवर रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अंधारामुळे पहाटेच्या वेळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसह महिलांना असुरक्षित वाटत होते, तसेच सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत 'सीविक मिरर'ने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेवून वाकड-हिंजवडी लिंक रोडवर पथदिवे बसवले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वाकड - हिंजवडी नवीन लिंकरोड वरील राॅयल मिराज सोसायटीच्या शेजारील ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार झाला होता. पुढे हा रस्ता हिंजवडीकडे जात असल्याने महापालिका हद्दीतील रस्त्याचे काम पुर्ण झाले होते. परंतू, या रस्त्यावर पथदिवे बसविले गेले नसल्याने तेथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.  रस्त्यावर अंधार असल्याने अनेक गैरप्रकार देखील वाढू लागले होते. वाकड-हिंजवडी लिंक रोडवर रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अंधारामुळे  पहाटेच्या वेळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही असुरक्षित वाटत होते, तसेच सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशाल वाकडकर यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांनी पालिका आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत, नागरिकांच्या प्रश्नावर सतत पाठपुरावा केला. अखेर, महापालिकेच्या विद्युत विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याला त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. विद्युत विभागाने वाकड-हिंजवडी लिंक रोड वरील रॉयल मिराज सोसायटी जवळील रस्त्यावर अत्याधुनिक विद्युत पथदिवे बसविण्यात आले. या प्रकल्पामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता वाढली आहे. तसेच पहाटेच्या वेळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. परिसरात आता अपघातांची संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे, तसेच पादचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

पदपथावर जीम बसवा, नागरिकांची मागणी
वाकड आणि हिंजवडीलगत हा रस्ता आहे. या रस्त्यावर पथदिवे लावल्याने या रस्त्यावर सकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले-मुली फिरत असतात. रस्त्याच्या बाजूला ओपन जिमचे साहित्य लावण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली आहे.

वाकड-हिंजवडी लिंक रोडवरील रॉयल मिराज सोसायटीजवळील रस्त्यावर विद्युत पथदिवे बसवण्याची नागरिकांची दीर्घकाळ रेंगाळलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नागरिकांचे जीवन सुरक्षित आणि सुलभ बनवणे हेच माझे उद्दिष्ट आहे. या कामासाठी महापालिका विद्युत विभागासह आयुक्ताचे मी आभार मानतो. भविष्यात देखील नागरिकांच्या हितासाठी मी असेच प्रयत्न करत राहीन.
- विशाल वाकडकर, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest