सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरूवारी (दि. ११) सायंकाळी ७ च्या सुमारास करण्यात आली आहे.
प्रबीर प्रकाश मुजूमदार (वय २४, वर्षे रा. सद्या. फलॅट नं १ पहिला मजला, सिध्दी विनायक बिल्डींग, धर्मवीर संभाजीनगर, त्रिवेणी चौक, भारती विद्यापीठ पुणे. मुळ पत्ता- घोना नादीया, वेस्ट बंगाल), दिनेश यादव आणि विराज या तिन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रबीर मुजूमदार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोहवा ५३५ अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे सुनिल जगन्नाथ शिरसाट यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलांना पैशांचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकुण २९ हजार ०४० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. तसेच तीन जणांवर कलम ३७०, (३), ३४ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४,५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.