पीएमपीएमएल बसची टेम्पोला धडक, दोन जण जखमी
पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील डांगे चौक (Dange Chowk) ते औंध बीआरटी (Aundh BRT) मार्गावर भीषण अपघात झाला आहे. पीएमपीएमएल बसने तीन चाकी टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात (Accident) दोन जण जखमी झाले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकड येथील डांगे चौक ते औंध बीआरटी मार्गावरून पीएमपीएमएल बस पहाटेच्या सुमारास जात होती. या दरम्यान तीन चाकी टेम्पोने बीआरटी मार्गावर यु-टर्न घेतला. त्यामुळे भरधाव येणाऱ्या बसची टेम्पोला धडक बसली.
या अपघातात दोन जखमी झाले आहेत. तसेच बसच्या धडकेत टेम्पो पलटी झाला आहे. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.