आषाढी वारीसाठी वारकरी सज्ज, कसे असेल वेळापत्रक? कुठे असणार मुक्काम ?
महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान उद्या म्हणजेच १० जून रोजी होणार आहे. तुकोबांची ही पालखी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर २८ जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे.
तर दुसरीकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी म्हणजेच ११ जून रोजी प्रस्थान होणार आहे. आळंदीतून ११ जून रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे. तसेच २८ जून रोजी पंढरपूरमध्ये पालखी दाखल होणार आहे. त्यामुळे हळूहळू देहू आणि आलंकापुरीत वारकरी जमायाल सुरूवात झाली आहे. पालखी प्रस्थानासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने प्रशासन आणि वारकरी सांप्रदाय पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी सज्ज झाले आहे. या दोन्ही पालख्यांचे मुक्काम कसे असतील, याबाबतचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे....
श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा :
१० जून - देहू येथून प्रस्थान
११ जून - आकुर्डी
१२, १३ जून – नाना पेठ, पुणे
१४ जून – लोणी काळभोर
१५ जून – यवत
१६ जून - वरवंड
१७ जून – उंडवडी गवळ्याची
१८ जून - बारामती
१९ जून – सनसर
२० जून - अंथुर्णे
२१ जून – निमगाव केतकी
२२ जून - इंदापूर
२३ जून - सराटी
२४ जून - अकलूज
२५ जून - बोरगाव
२६ जून - पिराची कुरोली
२७ जून – वाखरी
२८ जून – पंढरपूर
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
११ जून - आळंदीहून प्रस्थान
१२, १३ जून – भवानी पेठ, पुणे
१४ जून – सासवड
१५ जून – सासवड
१६ जून – जेजुरी
१७ जून – वाल्हे
१८ जून - लोणंद
१९ जून – लोणंद
२० जून - तरडगाव
२१ जून – फलटण
२२ जून - वरद
२३ जून - नाटेपुते
२४ जून - माळशिरस
२५ जून - वेळापूर
२६ जून – भंडीशेगाव
२७ जून – वाखरी
२८ जून – पंढरपूर
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.