इंद्रायणी नदीत बुडालेले दोन तरुण ४८ तासांपासून बेपत्ता, शोध अद्यापही सुरूच
पिंपरी-चिंचवडमध्ये इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी समोर आली होती. गेल्या ४८ तासांपासून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप ते मिळून नाहीत. त्यामुळे अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफ जवानांकडून दोघांचा शोध सुरू आहे.
शक्तिमान कुमार (वय २०) आणि सोनू कुमार (वय २०) असे इंद्रायणी नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू आणि शक्तिमान दोघे ही मूळ बिहार राज्यातील आहे. काही महिन्यांपासून ते पिंपरी- चिंचवड शहरात कामानिमित्त आले होते. सध्या ते मोशी परिसरात वास्तव्यास होते.
शनिवारी दुपारी इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी दोघेजण उतरले तर तिसरा मित्र हा पोहायचे नसल्याने परत गेला. यादरम्यान, दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. बराच वेळ झाला तरी दोघे येत नसल्याने तिसरा मित्र त्या ठिकाणी आला. त्याला शक्तिमान आणि सोनूचे कपडे नदी काठावर दिसले. त्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. गेल्या ४८ तासांपासून अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफ जवान दोघांचा शोध घेत आहेत. अद्याप दोघेही मिळून आले नाहीत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.