शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर पोलीस (Police) दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत (transferred) बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने नुकतीच १०४ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती दिली. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षकांचा समावेश होता. बढती वर बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
\हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव या अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे. यातील विवेक मुगळीकर यांची पिंपरी चिंचवड शहरात सहायक आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर शहर पोलीस दलातील आठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले पोलीस निरीक्षक -
शंकर अवताडे (गुन्हे शाखा युनिट चार ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे)
श्रीराम पौळ (शिरगाव परंदवडी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी)
कृष्णदेव खराडे (चिंचवड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरगाव परंदवडी)
दिलीप शिंदे (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड)
अमरनाथ वाघमोडे (तळवडे वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावेत)
शिवाजी गवारे (रावेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी)
रणजीत सावंत (तळेगाव एमआयडीसी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी)
संजय तुंगार (सायबर सेल ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव एमआयडीसी)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.