संग्रहित छायाचित्र
चिखली : किराणा सामान आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या पती, पत्नी आणि मुलाला एका ट्रकने धडक दिली. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि. १८) दुपारी बारा वाजताच्या सुमारास चिखली येथील रिव्हर चौकात घडला.गणेश अशोक येवले (वय ४०, रा. चिखली), उषा गणेश येवले, कृष्णा गणेश येवले अशी जखमींची नावे आहेत. गणेश यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एमएच २०/जीसी ६४०८) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश हे त्यांची पत्नी आणि मुलाला घेऊन मोशी येथील डी मार्टमध्ये किराणा सामान आणण्यासाठी जात होते. रिव्हर चौक येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात गणेश, त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.