९ वर्षाच्या चिमुकल्याचा अल्पवयीन मुलांकडून विनयभंग
बाहेर खेळत असताना ९ वर्षाच्या चिमुकल्याच्या गुप्तांगात काठी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १३) सायंकाळी ६ च्या सुमारास भोसरी एमआयडीसी परिसरातील महात्माफुलेनगर येथील म्हसोबा मंदीराचे पाठीमागे घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास ९ वर्षाचा चिमुकला महात्माफुलेनगर येथील म्हसोबा मंदीराचे पाठीमागील परिसरात खेळत होता. यावेळी दोन अल्पवयीन मुलांनी चिमुकल्याच्या गुप्तांगात काठी घातली. यामुळे चिमुकल्याचा मोठी दुखापत झाली आहे.
या प्रकरणी ९ वर्षाच्या मुलाच्या वडीलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीसांनी दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात कलम ३७७, ३४ सह लैंगिक अपराधांपासुन बालकाचे संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम ३ ( ब ), ४, ५ ( एम ) आणि ६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.