पिंपरी चिंचवडमध्ये पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खासगी बस जळून खाक झाल्याची मोठी दुर्घटना घडली. पण बस चालकाच्या प्रसंगावधनामुळं प्रवासी थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, डांगे चौक ते औंध मार्गावर जगताप डेअरी चौकात ही घटना घडली. या घटनेत बसचा मागील भाग संपुर्ण जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. चालकाने वेळीच गाडी थांबवली आणि प्रवाश्यांना खाली उतरवले.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखेड वरून भोसरीच्या दिशेने खासगी आराम बस येत होती. ही बस जगताप डेअरी जवळ आल्यावर बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी बस मध्ये सात प्रवासी होते. चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळेतच संपूर्ण बसने पेट घेतला. याबाबत पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास माहिती मिळाल्यावर रहाटणी येथील बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी बसला लागलेली आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सविस्तर माहिती थोड्यावेळात....