पिंपरी आरटीओत कर्मचारीच येतात हेल्मेटविना

शहरातील शासकीय कार्यालय प्रमाणेच पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकीने येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना आता ‘हेल्मेट’ परिधान करण्याबाबत सक्ती आहे.

without helmets

पिंपरी आरटीओत कर्मचारीच येतात हेल्मेटविना

आरटीओत सक्ती कागदावरच, प्रशासनाकडून पुन्हा सूचना देण्याची वेळ, १ डिसेंबरपासून कडक कार्यवाही

शहरातील शासकीय कार्यालय प्रमाणेच पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकीने येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना आता ‘हेल्मेट’ परिधान करण्याबाबत सक्ती आहे. मात्र, त्याला कोणी जुमानत नसल्याने आरटीओ प्रशासनाला पुन्हा सूचना देण्याची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील इतर सरकारी कार्यालयाच्या अगोदर आरटीओमध्येच हेल्मेट सक्तीबाबत अनास्था असल्याचे दिसून येते. 

मागील महिन्यांत विभागीय आयुक्तांनी शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘हेल्मेट’ सक्तीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पुणे आरटीओ कार्यालयातील तीन ते चार कर्मचाऱ्यांना ‘हेल्मेट’ न परिधान केल्याने मेमो देण्यात आला होता. आता हा निर्णय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनादेखील अनिवार्य करण्यात आला आहे. तीच कारवाई पिंपरी चिंचवड शहरात मध्ये करावी लागणार आहे. त्यामुळे आता पिंपरी आरटीओ यावरती कोणती अंमलबजावणी करते, याकडे लक्ष लागले आहे 

वाहन परवाना आणि इतर कामांसाठी आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. रस्ता सुरक्षितता आणि वाहतुकीसाठी काम करणाऱ्या आरटीओ विभागाच्या कार्यालयातच येताना अनेकजण विना हेल्मेट येतात. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने ‘हेल्मेट’ सक्तीचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या कामात सर्वच शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने कारवाई होत नव्हती. मात्र आता प्रभावीपणे काम केले जाईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.. दरम्यान, येत्या दोन दिवसात याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. पुणे शहरांमध्ये आरटीओच्या वतीने हेल्मेट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या धरतीवर पिंपरी चिंचवड शहरात देखील ती सुरू करावी लागणार आहे.  

आरटीओचा सुरक्षारक्षक अनभिज्ञ 

आरटीओ मधील येणाऱ्या नागरिकांना प्रत्यक्षामध्ये कार्यालयाच्या आत पार्किंग नसल्याने. त्यांना आत प्रवेश नाही. मात्र, कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी तसेच परिवहन निरीक्षक यांना हेल्मेट सक्ती बाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे. दरम्यान याबाबत या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकला त्याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडून प्रत्येक विभागाला सूचनादेखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा अंतिम सूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर हेल्मेट आढळून न आल्यास कारवाई करावी लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश 

 जिल्ह्यात १ डिसेंबरपासून शासकीय कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करावी. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. हिंजवडी परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्यात यावीत, असेही अधिकाऱ्यांना सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest