मतसंग्राम २०२४: चिंचवड विधानसभेसाठी आरएसएसकडून चाचपणी

चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभेतून महायुतीचे उमेदवार निवडून आखणी सुरू आहे. याकरिता गुजरातचे माजी गृहमंत्री तथा प्रभारी प्रदीपसिंह जडेजा हे तळ ठोकून आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Oct 2024
  • 02:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भाजपचा सर्वमान्य उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू

चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभेतून महायुतीचे उमेदवार निवडून आखणी सुरू आहे. याकरिता गुजरातचे माजी गृहमंत्री तथा प्रभारी प्रदीपसिंह जडेजा हे तळ ठोकून आहेत. त्यांनी तिन्ही विधानसभेचा आढावा घेतला आहे. यामध्ये चिंचवडमधून भाजप पक्षाकडून अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवारी न मिळाल्यास काहीजण बंडखोरी करून उमेदवाराला दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही चाचपणी सुरू असून भाजपचे निष्ठावान उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.  

चिंचवड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह पाच-सहाजण इच्छुक आहेत. प्रस्थापितांना विरोध करत भाजपमधील काही नगरसेवक वेगळा गट तयार करण्याच्या हालचाली करत आहेत. दोन पदाधिकाऱ्यांनी पक्षाला थेट राजीनामा पाठवून नुकतीच नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेत नवीन चेहऱ्याबाबतही हालचाली भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू आहेत

भाजप प्रभारी तथा प्रदीपसिंह जडेजा यांनी शहरात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे बूथरचना, मतदार नोंदणी संदर्भात आढावा घेतला. पक्षाची ध्येयधोरणे, महायुती सरकारने अर्थसंकल्पात जनतेशी संबंधित घेतलेले निर्णय आणि योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ यंत्रणा मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या. एक दिलाने काम करण्याचा सल्ला दिला.

यानंतरही चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपमधील इच्छुकांमध्ये एकमत होताना दिसत नाही. भाजपच्या कुशीत तयार झालेल्या आणि निष्ठावान लोकांनीही आगामी उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून आग्रही आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव आहे. या मतदारसंघात भाजप पक्षाची व आरएसएसची विचारधारा असणारा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने भाजपच्याच उमेदवाराचे प्राबल्य दिसून येते. हक्काचा मतदारसंघ हातातून जाऊ नये यासाठी भाजपमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या विचाराचा उमेदवार चिंचवडमध्ये देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

तिन्ही विधानसभेवर भाजपच्या आमदारांचे विशेष लक्ष
चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी (एपी गट) आमदार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू असलेले गुजरातचे माजी गृहमंत्री तथा प्रभारी प्रदीपसिंह जडेजा हे तळ ठोकून आहेत. त्याशिवाय प्रत्येक विधानसभेसाठी भाजपकडून प्रत्येक एक आमदार नियुक्त केला आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघात प्रत्येक इंत्थभूत माहिती अमित शहाकडे जात आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी भाजपसह सहकारी पक्षाचे देखील आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest