संग्रहित छायाचित्र
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ३३ उमेदवार रिंगणात होते. या निवडणूकीत महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात चुरशीची लढत झाली. हे दोन उमेदवार वगळता अन्य ३१ उमेदवार छोट्या पक्ष-संघटनाचे प्रतिनिधी होते. तरीही १६ हजार ७६० उमेदवारांनी नोटाला मतदान करत उमेदवार पसंद नसल्याचे दाखवून दिले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील १६ हजार ७६० नागरिकांनी ‘नोटा‘ला मतदान केले. त्यातील ३१ मते ही पोस्टल मते होती. तर, एकूण मतदारांच्या टक्केवारीमध्ये १.१८ टक्के नागरिकांनी ३३ पैकी आपल्यासाठी एकही उमेदवार योग्य नसल्याचे मत नोंदवले आहे. यंदा १४ लाख १९ हजार ४०१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यातील १६ हजार ७२९ आणि पोस्टल मतदानात ३१ अशा एकूण १६ हजार ७६० जणांनी सर्वच उमेदवारांना नाकारले. एकूण मतदारांच्या टक्केवारीमध्ये हे १.१८ टक्के हे मतदान होते.
मावळ लोकसभेसाठी मुख्य लढत ही दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये झाली. त्यात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना (उबाठा गट) संजोग वाघेरे पाटील यांना हरवत ९६ हजार ६१५ मताधिक्याने निवडून आले. निवडणुकीत उमेदवारांनी पक्ष बदलले, गद्दारी या लेबलसह रस्ते, पाणी प्रश्न, बंदिस्त जलवाहिनी, मेट्रो प्रकल्प, नदी प्रदूषण, झाडांची कत्तल, प्रलंबित रस्ते, यासह इतर विविध मुलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपली वेळोवेळी भूमिका मांडली. तसेच आपले प्रश्न सोडवले नाही तर, आम्ही मतदानच करणार नाही, असेही जाहीर केले होते. विविध मागण्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने एकूण मतदारांनी सुमारे एक टक्के नागरिकांनी ‘नोटा‘ला पसंती देत आम्हाला एकही उमेदवार योग्य वाटत नसल्याचे यातून स्पष्ट केले. त्यामुळे मतदारांना मावळ लोकसभा निवडणुकीत उमेदवार पसंद नसल्यानेच त्यांनी नोटाला मतदान केल्याचे दिसून येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.