संग्रहित छायाचित्र
पत्नीला चापट मारल्याने ती खाली पडली व तिच्या डोक्याला मार लागला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी आळंदी रोड, भोसरी येथे घडली.खुशबू राजकरण हरीजन (वय २८, रा. जयभीम पार्क, आळंदी रोड, भोसरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या पत्नीचे नाव आहे. पोलीस हवालदार सचिन दत्तात्रय गोगावले (वय ४४) यांनी सोमवारी (दि. २३) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजकरण गणेशप्रसाद साकेत (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकरन याचे आपली पत्नी खशबू हिच्यासोबत १६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास भांडण झाले. रागाच्या भरात आरोपी राजकरण याने पत्नी खशबू हिला चापट मारली. त्यामुळे ती खाली पडून तिच्या डोक्याच्या मागील बाजूला दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दखल केले. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुखापतीमुळे ती उपचारादरम्यान मयत झाली. यामुळे आरोपी राजकरण याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.