चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आघाडीव उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुरुवारी (ता १४) जाहीर सभा होत आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, विरोधकांना चितपट करण्यासाठी वस्ताद नेमका कुठला डाव टाकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन याठिकाणी सभेची सर्व तयारी करण्यात आली असून, दुपारी बारा वाजता शरद पवार चिंचवड वासियांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्याच्या सभेसाठी चिंचवड मतदार संघातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी बाईक रॅली काढून, मोठया संख्येने सभेच्या ठिकाणी पोहचणार आहेत. दरम्यान, अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या चिंचवड विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.
तर शरद पवार यांच्या स्वागतपर पोस्टचा अक्षरशः पाऊस सोशल मीडियावर चिंचवड वासियांकडून सुरु आहे.
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होत असून, वारं फिरलंय, निवडणूक आता लोकांनी हातात घेतली आहे. जनता यंदा प्रस्थापितांना घरी बसवणारच, तुतारी वाजणार, राहुल दादा आमदार होणार अशी जोरदार चर्चा मतदार संघात ऐकायला मिळत आहे. ऐन टायमाला विजयी डाव टाकत बाजी मारण्यात मातब्बर असणारे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे नक्की आपल्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर, चिंचवड मतदार संघात उद्या होत असलेल्या शरद पवार यांच्या निर्णायक सभेचा धसका विरोधकांनी सुद्धा घेतल्याची चर्चा मतदार संघात चांगलीच रंगली आहे.
असा असेल उद्याच्या रॅलीचा मार्ग -
सकाळी साडे नऊ वाजता सांगवी येथील साई चौक येथून भव्य रॅलीला सुरुवात होईल. अतिशय शिस्तबद्ध पणे, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या जय घोषात वाजत-गाजत हजारोच्या संख्येत कार्यकर्ते,पदाधिकारी सहभागी होऊन, दुपारी बाराच्या सुमारास सभेपूर्वी आहेर गार्डन वाल्हेकरवाडी येथे भव्य रॅलीची सांगता होईल. त्यानंतर शरद पवार शहरवासियांना मार्गदर्शन करणार आहेत.
पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीच्या जडण-घडणीत आणि जगदविख्यात हिंजवडी आयटी पार्कचे जनक शरद पवार साहेब यांचे हात आणखी बळकट करण्यासाठीमहाविकास आघाडीला आपण विजयी करावे. ह्या विजयाची नांदी पवार साहेब आहेर गार्डन येथील सभेतुन करणार आहेत. त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.
- राहुल कलाटे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.