पिंपरी-चिंचवड : आरटीओची एसएमएस सेवा फेल?

थकित दंड वसूल करण्याबाबत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) एसएमएस सुविधा सुरू केली होती. मात्र त्यानंतरदेखील दंडाची रक्कम भरली जात नसल्याने ही सेवा सपशेल फेल गेली असल्याचे दिसून येते.

पिंपरी-चिंचवड : आरटीओची एसएमएस सेवा फेल?

दंडाची रक्कम पोहोचली साडे दहा कोटी रुपयांपर्यंत, वसूल करण्यासाठी पाठविले एक लाख मेसेज

थकित दंड वसूल करण्याबाबत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) एसएमएस सुविधा सुरू केली होती. मात्र त्यानंतरदेखील दंडाची रक्कम भरली जात नसल्याने ही सेवा सपशेल फेल गेली असल्याचे दिसून येते. विविध दंडाची १० कोटी ३९ लाख ७६,०५१ एवढी रक्कम थकीत आहे. एकूण साडे पाच लाखांहून अधिक चलने आहेत. ही रक्कम वाढत जात असल्याने आरटीओने पाठवलेले एसएमएसची संबंधित वाहनचालकांनी दखल घेतली नसल्याचे दिसून आले.

वाहनधारकास सीपी-आरटीओपीसीएम या नावाने लघुसंदेश सुविधा सुरू करण्यात आली आहे. संबंधित खासगी कंपनीशी आरटीओ विभागाने करार देखील केला आहे. त्यामुळे आरटीओकडून वाहनधारकांचा नंबर संबंधित कंपनीकडे गेल्यानंतर त्वरित मेसेज प्राप्त होत आहेत. मात्र त्याची दखल वाहनचालक घेत नसल्याचे दिसून येत आहे. या सेवेचा आढावा आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी घेणार होते. मात्र, त्याचा प्रतिसाद मिळत नसल्याने या सेवेचा उपयोग नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरटीओकडे थकीत दंड न भरणाऱ्या वाहनचालकांची यादी वाढतच चालली आहे. वाहनचालकांना नोटीस पाठवूनदेखील कोणताही प्रतिसाद मिळत नाही. 

खासगी कंपनीच्या मार्फत ही सेवा सुरू केली आहे. या संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कार्यालयाचे इंग्रजी व मराठी स्वरूपातील मागणीपत्र नागरिकांना पाहता येणार आहे, असे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले. आत्तापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक क्रमांकांची यादी या कंपनीकडे देण्यात आली आहे. मात्र त्यापैकी किती जणांनी पैसे भरले याची नेमकी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांना नाही.

रस्त्यावर धावणाऱ्या अवजड वाहनांबरोबरच, प्रवासी वाहतूक आणि स्कूल बस व्हॅन यांना फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य आहे. मात्र, ते याकडे दुर्लक्ष करतात. कायदेशीररित्या त्यांना नोटीस देण्यात येते. तरीसुद्धा अनेक वाहनचालक त्याकडे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यामुळे आता या वाहनधारकांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या  टप्प्यात या वाहनांनादेखील एसएमएस केले जाणार आहेत. मात्र याआधी मेसेज पाठवलेल्या अनेक वाहनचालकांनी त्याची गंभीर दखल घेतली नसते दिसून येत आहे. 

दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांना दंड ठोठावले जातात. ते दंडही पिंपरी चिंचवड आरटीओत येतात. त्यामुळे दंडाची रक्कम जास्त वाढली आहे. वाहतूक नियम उल्लंघनाबाबत इ चलनाच्या नोटीस पहिल्या टप्प्यात पाठवल्या आहेत. मात्र, या सेवेचा कितपत फायदा झाला याची नेमकी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांकडे नाही. अनेकांनी संबंधित एसएमएस अद्याप वाचलाच नसल्याचे दिसून येत आहे. 

रिक्त पदे भरल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

पिंपरी चिंचवड आरटीओ याचा दर्जा वाढल्याने आता ते प्रादेशिक परिवहन कार्यालयास झाले आहे.  मात्र त्या तुलनेने अधिकारी कर्मचारी नसल्याने कामे वेगाने होत नसल्याचे आरोप होत आहे. मात्र संबंधित रिक्त पदांची नेमणूक केली आहे, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिली. तसेच रिक्त पदामुळे कोणतेही काम रखडली नसल्याची त्यांनी देखील स्पष्ट केले.

Share this story

Latest