पिंपरी-चिंचवड : ‘एककल्ली कारभारामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली करा’

शहरातील नागरिक, माजी नगरसेवक, राजकीय पक्षांना विश्वासात न घेता प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह एककल्ली कारभार करत असल्याने प्रशासनात अनागोंदी सुरू असून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

PCMC News

संग्रहित छायाचित्र

भाजप कार्यकर्ते अमोल थोरात यांची फडणवीस यांच्याकडे मागणी

शहरातील नागरिक, माजी नगरसेवक, राजकीय पक्षांना विश्वासात न घेता प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह एककल्ली कारभार करत असल्याने प्रशासनात अनागोंदी सुरू असून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे आयुक्तांना हटवून सक्षम अधिकारी आयुक्तपदी नेमावा अशी मागणी भाजपचे अमोल थोरात यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन दिले आहे.

२०२२ पासून महापालिकेत प्रशासकराज असून आयुक्त म्हणून शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. प्रशासक म्हणून त्यांनी पारदर्शी, उत्तम कामगिरी बजावणे अपेक्षित असताना त्यांचा एककल्ली कारभार सुरू असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. थोरात पुढे म्हणतात, आयुक्तांनी बड्या बिल्डरला रस्ते खोदाई प्रकरणात पाठीशी घालून पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. भाजपने भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कामकाजाचे वचन देत सत्ता मिळवली होती. भाजपकडून शहरवासीयांना अपेक्षा आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक तसेच लोकसभा निवडणुकीतून पिंपरी- चिंचवड शहरातील मतदारांनी भाजपवर विश्वास दर्शविला आहे. शेखर सिंह यांची कार्यशैली संशयास्पद आहे. तसेच पालखी सोहळ्यावेळी ते प्रदीर्घ रजेवर गेले. पालखी सोहळ्याबाबत ते उदासीन असल्याचे दिसून आले. 

महापालिकेचा प्रशासकीय कारभार असाच सुरू राहिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मुद्दा मिळून भाजपचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना पदावरून हटवून आयुक्तपदी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनात केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest