धर्म हा जीवनाचा आधार, तो टिकवायला हवा

संपूर्ण जगाची मांडणी संघर्षावर आधारित आहे. गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रचलित असलेल्या विचारसरणीच्या प्रभावाखाली आपले जीवन आहे. त्याने सुविधा वाढल्या पण निरंतर कलहही उत्पन्न होत आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी अध्यात्माच्या आधारावर भौतिक जीवन सुखकर करणारा शाश्वत सनातन धर्म आत्मसात केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Dec 2024
  • 03:13 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

श्री मोरया गोसावी महाराज संजीवन सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन

संपूर्ण जगाची मांडणी संघर्षावर आधारित आहे. गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रचलित असलेल्या विचारसरणीच्या प्रभावाखाली आपले जीवन आहे. त्याने सुविधा वाढल्या पण निरंतर कलहही उत्पन्न होत आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी अध्यात्माच्या आधारावर भौतिक जीवन सुखकर करणारा शाश्वत सनातन धर्म आत्मसात केला. त्यातील आपलेपणा हाच विश्वाचा आधार आहे, तो वाढवायला हवा, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी (दि. १७) व्यक्त केले.

धर्म समाजाला सुरक्षित आणि वैभवसंपन्न ठेवण्याचे काम करतो. समाजाच्या एकत्वाचा आधार असलेला धर्म व्यवहारातून प्रकट व्हायला हवा. धर्म अतिवादाला थारा देत नाही. सर्वांच्या जीवनाचा आधार असलेला धर्म टिकला पाहिजे आणि देशकाल परिस्थितीनुसार त्याचे जागरण व्हावे, असेही ते यावेळी म्हणाले. चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज ४६३ संजीवन सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलते होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, देवराज डहाळे आदि उपस्थित होते. कार्यक्रमात चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

भूतदया हे सनातन धर्मातील तत्व

सृष्टी ही धर्माच्या आधारे चालते. सत्य, करुणा, सुचिता, तपस हे धर्माचे चार स्तंभ आहेत, असे सांगून डॉ. भागवत म्हणाले, सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांची उन्नती करणारा हा धर्म आहे. त्यासाठी भारत जगला, वाढला पाहिजे. माणसाने स्वतःशी, इतरांशी आणि सृष्टीशी चांगले वागले पाहिजे. भूतदया हे सनातन धर्मातील तत्व आहे.  करोनानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी संख्या खूप वाढली आहे. त्या काळात लोकांनी इतरांचे दुःख ओळखून त्यावर काम करण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली. पूजा आणि सोहळ्याच्या पलिकडे जात संतपुरूषांचे जीवन आपण आत्मसात करावे. त्यांनी केलेल्या कार्याच्या दिशेला निदान काही पाऊले चालायला हवीत, असेही भागवत म्हणाले.

चिंचवडमध्ये देवस्थान कॉरिडॉर - आयुक्त सिंह

आळंदी, देहू आणि मोरया गोसावी देवस्थानचा कॉरिडॉर विकसित व्हायला हवा. केंद्राच्या प्रसाद योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून शहरातील या मुख्य देवस्थानांचा कॉरिडॉर विकास व्हायला हवा. नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य चालू असून, लवकरच पवना नदीसुधार प्रकल्पदेखील पूर्ण होईल, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

Share this story

Latest