रावेत कार अपघात
पिंपरी चिंचवड शहरातील रावेतमध्ये भरधाव कार वीजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात वीजेचा खांब पुर्णपणे उखडून पडला आहे. तर कारमधील दोन जण बेशुद्ध पडले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रावेत ते डांगे चौक रोडवरील ब्ल्यू वॉटर हॉटेल जवळ आज सकाळच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास रावेतवरून डांगे चौकच्या दिशेने कार येत होती. मात्र, ब्ल्यू वॉटर हॉटेल जवळ येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार थेट रस्त्यालगत असलेल्या वीजेच्या खांबावर जाऊन आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या धडकेत वीजेचा खांब उखडून पडला. तसेच कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी कारमध्ये दोन जण होते. अपघातात दोघेही बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ रावेत तेथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रावेत पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.