सुनील शेळके अजून एव्हढा मोठा झाला नाही - मदन बाफना
रोहित आठवले
शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना तंबी दिल्यानंतर सुनील शेळके यांनी देखील प्रतिउत्तर देत शरद पवारांना (Sharad Pawar) भेटून याबाबतचा जाब विचारणार असल्याचे म्हटलंय. यावर माजी मंत्री मदन बाफना (Madan Bafna) यांनी आक्रमक होत, सुनील शेळके यांना आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर त्यांनी शरद पवार यांना भेटून दाखवावं असं म्हणत शेळके शरद पवारांना भेटण्याइतके मोठे झाले नाहीत, आम्ही सरळ मार्गी चालत आहोत, उगाच वाकड्यात शिरायला लावू नका असा थेट इशारा बाफना यांनी शेळकेंना दिलाय. मात्र आता मदन बाफना यांना आमदार शेळके समर्थकांकडून लक्ष्य करण्यास सुरुवात झाली आहे. मदन बाफना हे काँग्रेसचे मावळचे (Maval) माजी आमदार तसेच मंत्री देखील होते. तसेच शरद पवार यांचे मित्र देखील आहेत.
हे तुतारी फुंकणारे नव्हे हे तर कान फुंकणारे निघाले...
तर दुसरीकडे आता सुनील शेळके समर्थकांनी सोशल मीडियावर मदन बाफना यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करून त्या व्हायरल करायला सुरुवात केली आहे. शरद पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लोणावळ्यातील भाषण सविस्तर लिहिले. त्यात मदन बाफना यांचा उल्लेख शरद पवारांनी केला आहे. त्याचाच संदर्भ घेऊन आता शेळके समर्थकांनी सोशल मीडियावर मदन बाफना विरोधी विविध पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.