राजकीय लोकांनी आक्षेप घेतलेल्या ड्रीम ११ मध्ये पीएसआयने जिंकले दीड कोटी रुपये
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये कार्यरत असलेल्या एका पीएसआयने ड्रीम्स ११ मध्ये दीड कोटी रुपये जिंकले असून टॅक्स जाऊन त्याला एक कोटी पाच लाख रुपये मिळाले आहेत. या पीएसआयची सध्या नियुक्ती एका टोलनाक्यावरती सुरक्षा पथकामध्ये करण्यात आली होती. या पीएसआयने ऑन ड्युटी खेळून हे पैसे जिंकले आहेत की नोकरी संपल्यानंतर घरी गेल्यावर खेळून पैसे कमावले आहेत. याबाबत सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू आहे.
सोमनाथ झेंडे असे करोडपती झालेल्या पीएमआयचे नाव आहे. ड्रीम ११ ची जाहिरात करणाऱ्या बॉलीवूडमधील अभिनेत्यांवर आणि विविध क्षेत्रातील खेळाडूंवर आक्षेप घेतला जात असताना एका पोलिसानेच पैसे जिंकल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. झेंडे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांनी ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केले होते. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली ती अव्वल आली असून त्यामुळे सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.