भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलीसांचा छापा
भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलीसांनी छापा टाकून ४ लाख ६६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी (दि. १०) केली आहे.
साजीद मुस्तफा शेख (वय ३२ वर्षे रा.शिवर्तीथनगर, थेरगाव), जावेद मुस्तफा शेख (वय ३८), राकेश श्रीबुध्दराम सिंग (वय २६ वर्षे रा. चिंचवड), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय २७), अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय २२) आणि सर्फराज शराफतउल्ला शेख (वय ३५) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस चिंचवड आणि तळेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एका कारखान्यात भेसळयुक्त पनीर पदार्थ तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी छापा टाकून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४ हजार किंमतीचे १४० लिटर ॲसेटीक अॅसीड, ६ हजार ३२० रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल, ४ हजार ५०० रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, २०० रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकुण ४ लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.