संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सेक्टर क्रमांक.२३ निगडी येथील पाणीपुरवठा गुरुवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बंद राहणार आहे. तसेच १८ ऑक्टोबर रोजीचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सेक्टर क्रमांक २३, निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा क्र. २ चे फिल्टर हाऊसचे इनलेट गेट बदलण्यात येणार असून टप्पा क्र. १ चे सीएलएफ ड्रेनचा व्हॉल्व बदलणे, टप्पा क्र. १ आणि २ चा व्हॉल्व बसवणे आदी कामे करावयाची असल्याने गुरुवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेत होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी सर्व यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याने १८ ऑक्टोबरचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे.
सर्व नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाण्याचा वापर करावा, तसेच महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.