पिंपरी चिंचवड: आयुक्तांच्या डेडलाईनपूर्वी नाल्यांची साफसफाई होणार?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. त्यामुळे ३१ मे पर्यंत शहरातील सर्व छोटे - मोठे नाले साफसफाई पूर्ण करावी, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते. मात्र, आयुक्तांच्या डेडलाईनला अवघे पाच दिवस उरले असून पावसाळा तोंडावर आला आहे.

PCMC News

पिंपरी चिंचवड: आयुक्तांच्या डेडलाईनपूर्वी नाल्यांची साफसफाई होणार?

डेडलाईन संपण्यास पाच दिवस बाकी, शहरात १३५ छोट्या तर ५७ मोठ्या नाल्यांची सफाई आवश्यक

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. त्यामुळे ३१ मे पर्यंत शहरातील सर्व छोटे - मोठे नाले साफसफाई पूर्ण करावी, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते. मात्र, आयुक्तांच्या डेडलाईनला अवघे पाच दिवस उरले असून पावसाळा तोंडावर आला आहे.  शहरात केवळ ८० टक्के नाले साफसफाई केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई पूर्ण होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लहान-मोठे असे १९२ नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी त्यांच्या यांत्रिक पद्धतीने साफसफाईचे आदेश देण्यात आले आहेत. सुमारे १०० किलोमीटर अंतराचे नाले ३१ मे पूर्वी साफ करावेत, असा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आरोग्य विभागाला दिला होता. मात्र, आतापर्यंत ८० टक्केच नालेसफाई झाली आहे.

शहरामध्ये २ ते ११ मीटर रुंदीचे १०० किलोमीटर अंतराचे १४८ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने नाल्यांमध्ये राडारोडा, प्लास्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य टाकले जाते.

अनेक नागरिक घरगुती कचरा नाल्यांमध्ये टाकतात. गाळ साचल्याने नाले अरुंद व उथळ होतात. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून परिसरातील घर व दुकानांमध्ये शिरते. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्व नाले स्वच्छ केले जातात. त्यासाठी आयुक्तांनी २२ मार्चला नालेसफाई करण्याचे आदेश दिले आहेत.

डेडलाईन गाठणारच !

जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. पाऊस सुरू झाल्यास काम करता येत नाही. त्यामुळे उन्हाळ्यातच हे काम पूर्ण करणे आवश्यक असते. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग, स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात असून, ३१ मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

शहरातील नाले सफाई सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास ८० टक्के नालेसफाई झाली आहे. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने सफाई केली जात आहे. ज्याठिकाणी अरुंद नाले आहेत, तिथे मशिन जात नाही, अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची सर्व साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई करण्यात येत आहे.
- विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest