दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, ७ दुचाकी जप्त
पिंपरी चिंचवड परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख १० हजार किमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी (दि. २३) केली आहे.
चंद्रकांत ऊर्फ बाळु हरिचंद्र घोलप (वय ३६, रा. मुळगाव - चिंचवडगाव ता. वडवणी जि. बीड, सध्याचा पत्ता - इंद्रायणी घाट परिसर, आळंदी, ता. खेड जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीसांनी इंडोरंन्स चौक येथे नाकाबंदी लावली होती. नाकाबंदी दरम्यान एक इसम मोटारसायकल नंबर एम एच १३ एस व्हि ०६८६ वरून आला असता त्याला पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, तो न थाबता पळून जात होता. त्यामुळे त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले आणि सबंधित दुचाकीबद्दल विचारणा केली.
मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यानंतर पोलीसांनी कसून चौकशी केली असताना सदरची दुचाकी १७ मे रोजी महींद्र कंपनी गेट नं २ च्या बाहेरील मोकळया जागेतून चोरली असल्याचे सांगितले. त्यानंतर दुचाकीसहीत पोलीसांनी चंद्रकांतला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी केली असताना बीड, अहमदनगर आणि पिंपरी चिंचवडमधील एकूण १५ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच पोलीसांनी त्याच्याकडून आणखी ६ दुचाकी जप्त केल्या.
एमआयडीसी हद्दीतील कंपन्यामधील कामगारांनी सर्वजन मोटारसायकल वापरत असताना हेलमेटचा वापर करावा. तसेच कामगारांनी आपल्या मोटार सायकली कंपनीच्या आवारात कंपाऊंडच्या आत सिक्युरिटी / सीसीटीव्ही निगराणी खाली लावाव्यात. मोटार सायकलीला मेटल टायर लॉक लावावे आणि हॅन्डल लॉक करुन पार्क कराव्यात. जेणेकरुन कंपनी आवारामधुन होणाऱ्या चोरीस प्रतिबंध निर्माण होईल, असे आव्हाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.