पिंपरी-चिंचवड : ढिसाळ कामकाजावर शिक्कामोर्तब

आयुक्त शेखर सिंह यांनी योग्य नियोजन व सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणी सफाई व्यवस्थित न झाल्याने शहर तुंबले. त्यातच आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार घेतलेले राहुल महिवाल यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आणि संबंधित विभाग प्रमुखाने योग्य कामे न केल्याने थेट नाराजी व्यक्त करत चुका झाल्याचे मान्य केले, पण आयुक्त शेखर सिंह यांच्या टीमने योग्य काम न केल्यानेच शहर तुंबले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 27 Jun 2024
  • 11:28 am
pimpri chinchwad, waterlogging

ढिसाळ कामकाजावर शिक्कामोर्तब

राहुल महिवाल यांची पालिकेच्या कामावर नाराजी, पावसाळापूर्व कामे अपूर्ण असल्याची जाहीर कबुली

पंकज खोले : 
पिंपरी-चिंचवड शहरात नालेसफाई, सखल भागात पाणी साचणारी ठिकाणे यासह आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाचे योग्य नियोजन करून बैठका घेतल्या. पण, रविवारी झालेल्या पावसाने रस्त्यांना नदी, नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी योग्य नियोजन व सखल भागात पाणी साचणाऱ्या  ठिकाणी सफाई व्यवस्थित न झाल्याने शहर तुंबले.  त्यातच आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार घेतलेले राहुल महिवाल यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आणि संबंधित विभाग प्रमुखाने योग्य कामे न केल्याने थेट नाराजी व्यक्त करत चुका झाल्याचे मान्य केले, पण आयुक्त शेखर सिंह यांच्या टीमने योग्य काम न केल्यानेच शहर तुंबले होते. त्याचा फटका चिखली, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड भागातील नागरिकांना बसला आहे.

शहरात रविवारी (२३ जून) पावसाने कहर केला. आकुर्डी, पिंपरी, चिखली, भोसरी, कुदळवाडीमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शहरातील रस्त्यांना नदी, नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. पाऊस जास्त झाल्याने शहर तुंबल्याचा दावा महापालिकेने केला. शहरात पावसाळी लाईनमध्ये पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आडवी येणे, एमएनजीएलची गॅस पाईप लाईनमध्ये येणे, तसेच ऑप्टिकल फायबर केबल्स डकमधून नव्हे तर पावसाळी लाईनमधून टाकल्याने वाट लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडून शहर पाण्याखाली गेल्याची स्थिती निर्माण झाली.

बांधकामाचा राडारोडा, पेव्हिंग ब्लॉक, विटा, दगड, गोटे, कचरा यामुळे हे नाले दरवर्षी तुंबतात. या तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाळ्यात नाल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून धोकादायक परिस्थिती निर्माण होते. मात्र, अनेक नागरिक तसेच सोसायट्यात जमा झालेला कचरा थेट नाल्यांमध्ये टाकतात. या कचऱ्यामुळे नाले तुंबल्याचे दिसत आहेत. पावसामुळे शहरात गटार, रस्ते, नाला अशा ठिकाणी पाणी तुंबणे, पाणी घरात शिरणे, घराची पडझड होणे, वादळ वाऱ्यामुळे झाडे पडणे अशा दुर्घटना घडल्या. पण, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊनदेखील उपाययोजना करण्यासाठी सर्व यंत्रणा हतबल झाल्या होत्या.

तसेच नागरिकांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या प्रवास करतात. या नद्यांच्या तीरावर मोठ्या संख्यने नागरिक वास्तव्यास आहेत. नद्यांच्या उगमाकडील भागात अतिवृष्टी झाल्यास शहरातील नदी तटावर घरांमध्ये पाणी शिरण्याच्या शक्यता आहे.  तसेच जास्त पावसामुळे शहरात गटार, रस्ते, नाला अशा ठिकाणी पाणी तुंबणे, पाणी  घरात शिरणे, घराची पडझड होणे, वादळ वाऱ्यामुळे  झाडे पडणे अशा घटना घडल्या. नागरिकांना प्रचंड त्रास झाला. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार असूनही योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना फटका बसला आहे.

दरम्यान, पहिल्याच पावसात शहरात पाणी साचायला नको होते. त्यामुळे अजून आम्हाला काम करण्याची गरज असून आमच्या काही चुका झाल्या आहेत. त्या आता सुधारणा करू, असे आयुक्त राहुल महिवाल यांनी म्हटले. त्यामुळे एकप्रकारे विद्यमान आयुक्त शेखर सिंह यांच्या कामकाजावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित विभाग प्रमुख योग्यप्रकारे काम करत नसल्याचे दिसत आहे. नालेसफाई असो की पाणी साचणारे ठिकाणी अधिकारी- कर्मचारी हे काम करत नसल्याने नागरिकांना योग्यप्रकारे नियोजन न केल्याने फटका बसला आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

आपत्ती व्यवस्थापन कागदावर

दरवर्षी प्रमाणे यंदाही मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून यंदा सरासरी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. एकाच पावसाने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा केवळ कागदावर असल्याचे दिसून आले.  मान्सून काळात करावयाच्या उपाययोजना न केल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आपत्कालीन प्रतिसाद पथक स्थापन करूनदेखील वेळेवर मदतीला कोणी आले नाही. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांचे आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदोपत्रीच सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest