ताथवडे हादरले ! जेएसपीएम कॉलेजच्या बाजूला ३ ते ४ स्फोट; स्फोटानंतर विद्यार्थी रस्त्यावर
पिंपरी चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम कॉलेजच्या बाजूला तीन ते चार स्फोट झाले असून मोठी आग लागली आहे. या स्फोटानंतर परिसर हादरला आहे. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. सुदैवाने अद्याप तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडामध्ये एक गॅस टँकर आहे. त्याठिकाणी तीन ते चार स्फोट झाले आहेत. स्फोटानंतर घर इमारती हादरले आहेत. जेएसपीएम कॉलेजचे अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. घटनास्थळाच्या बाजूला अक्षर एलिमेंट या नावाची सोसायटी आहे ती पूर्ण सोसायटी हादरली असून स्फोटामुळे नागरिक घाबरलेले आहेत.
रस्त्यावर मोठी गर्दी गोळा झाली असून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. अजुन तरी जीवितहानी नसल्याचे समजते. पण बाजूला झोपड्या आहेत. कुलिंग झाले की समजेल जीवितहानी झाली आहे का ? याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, मोठ्या गॅस टँकर आणि मोठ्या सिलिंडर (कमर्शियल सिलिंडर) मधून गॅस चोरीचा प्रयत्न होत असताना ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावरून टँकर चालक पसार झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.