Pimpri Chinchwad : धक्कादायक! जय हिंद शाळेच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही; व्हीडीओ व्हायरल झाल्यावर शाळेने काढले कॅमेरे (Video)

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील प्रसिद्ध जयहिंद हायस्कूलमधील (Jaihind High School)स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे माहित असतानाही अशाप्रकारे शाळा प्रशासनाने कॅमेरे लावल्याचा पालकांचा आरोप आहे.

Jaihind High School CCTV

धक्कादायक! जय हिंद शाळेच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही; व्हीडीओ व्हायरल झाल्यावर शाळेने काढले कॅमेरे (Video)

शाळेला बजावली 'कारणे दाखवा' नोटीस

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील प्रसिद्ध जयहिंद हायस्कूलमधील (Jaihind High School)स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे माहित असतानाही अशाप्रकारे शाळा प्रशासनाने कॅमेरे लावल्याचा पालकांचा आरोप आहे. मात्र याबाबत पोलिसांकडे अद्याप कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाही. तर पालकांच्या तक्रारीनंतर शाळेने सीसीटीव्ही काढून घेतले आहेत. (Jaihind High School CCTV)

पिंपरी-चिंचवड शहरातील जयहिंद हायस्कूलमधील स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर समाज माध्यमातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तर काही पालकांनीही याला विरोध देखील केला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी शनिवारी (१६ मार्च) सकाळी शाळेच्या आवारात काही पालकांनी गर्दी केली होती. हे सीसीटीव्ही तब्बल पाच ते सहा वर्षांपासून स्वच्छतागृहांमध्ये लावले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागही खडबडून जाग आली. प्रशासनाने शाळेत जात तेथील कॅमेरे हटवले आहेत. तसेच शाळेला याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही लावणे गुन्हा आहे. हा मुलांच्या गोपनियतेचा भंग आहे. तसेच याबाबतचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शाळा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे. शाळेत भांडणे झाल्याने हे सीसीटीव्ही लावल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबत अद्याप कोणी तक्रारदार पुढे आलेला नाही. तक्रारदार पुढे आल्यास याबाबत आवश्यक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे सहा वर्षांपासून आहेत. वॉशरुमध्ये कॅमेरे बसवले नसून ते वॉश बेसिनकडे आहेत. त्याठिकाणी मुले हात धुतात. हे कॅमेरे बसवण्या पाठीमागे मुलांची सुरक्षितता हा एकच उद्देश होता. मात्र, पालकांनीच याबाबत तक्रार केल्याने आता सर्व कॅमेरे काढले आहेत. महिला शिक्षकांची ड्युटी सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत आहे. त्यांना कपडे बदलण्यासाठी सांगितले जात नव्हते. त्यामुळे महिला शिक्षकांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत.

-ज्योती मसंद, प्राचार्य, जयहिंद हायस्कूल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest