पिंपरी-चिंचवड : पाच मिनिटांत गुंडाळला नालेसफाई अन् आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

पावसाळा सुरू झाला असून नालेसफाई, आपत्ती व्यवस्थापन, आणि पालखी सोहळा या विषयावर महापालिका आयुक्त राहल महिवाल यांनी विभाग प्रमुखांकडून अवघ्या पाच मिनिटांत आढावा घेतला. त्यानंतर आपण आनंदी आणि प्रफुल्लित सर्वजण काम करूया, असे सांगून विभागप्रमुखांची बैठक आटोपली. त्यामुळे आयुक्त महिवाल यांनी पाच मिनिटांत शहराच्या नाले सफाईसह आपत्ती व्यवस्थापनाचा नेमका काय आढावा घेतला, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.  

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 12 Jun 2024
  • 03:10 pm
pimpri chinchwad

संग्रहित छायाचित्र

विभागप्रमुखांना महापालिका आयुक्त राहल महिवाल यांचा सल्ला, आनंदी आणि प्रफुल्लित राहून काम करूयात

विकास शिंदे :
पावसाळा सुरू झाला असून नालेसफाई, आपत्ती व्यवस्थापन, आणि पालखी सोहळा या विषयावर महापालिका आयुक्त राहल महिवाल यांनी विभाग प्रमुखांकडून अवघ्या पाच मिनिटांत आढावा घेतला. त्यानंतर आपण आनंदी आणि प्रफुल्लित सर्वजण काम करूया, असे सांगून विभागप्रमुखांची बैठक आटोपली. त्यामुळे आयुक्त महिवाल यांनी पाच मिनिटांत शहराच्या नाले सफाईसह आपत्ती व्यवस्थापनाचा नेमका काय आढावा घेतला, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.  

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे २८ जून २०२४ पर्यंत अर्जित रजेवर गेले आहेत. या कालावधीत राज्य शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास  प्राधिकरण महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला  आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिला आहे. महापालिका आयुक्त राहुल महिवाल यांनी मंगळवारी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत  बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शहरातील नाले साफसफाई, आपत्ती व्यवस्थापन, आषाढी वारी पालखी सोहळा या विषयाबाबत माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता रामदास तांबे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय चंद्र दादेवार, सहशहर अभियंता संजय खाबडे, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंबासे, मनोज सेठिया, अजय सूर्यवंशी, उपायुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, संदीप खोत, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, सीताराम बहुरे, साहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, वैशाली ननावरे, विजय वायकर, संध्या वाघ, प्रेरणा सिनकर, प्रकाश कातोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कामकाजाची, वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल माहिती घेतली. पालखी सोहळ्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच हा पालखी सोहळा आनंदी आणि प्रफुल्लित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना राहुल महिवाल यांनी यावेळी दिल्या.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, महापालिकेशी संबंधित तातडीच्या विषयांबाबत तत्काळ अवगत करून त्यावर वेळेत कार्यवाही करावी, नागरी सेवा पुरवताना नागरिकांच्या समस्या विचारात घेणे आवश्यक असते. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही महिवाल यांनी यावेळी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest