पिंपरी-चिंचवड: तहसील इमारतीचा प्रस्ताव धूळखात

महापालिकेच्या 'फ' क्षेत्रीय कार्यालय इमारतीत अप्पर तहसील कार्यालयात सुरू आहे, पण टपालाची वाढती संख्या, अपुरे मनुष्यबळ, कार्यालयाची अडगळीची जागा, अशा विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या तहसील कार्यालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. मात्र , निगडीतील अप्पर तहसील कार्यालयाला चिखलीमध्ये  सुसज्ज कार्यालय मिळावे म्हणून २० गुंठे जागेची मागणी करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र एक वर्ष लोटूनही या प्रस्तावावर सकारात्मक तोडगा निघाला नाही. अद्याप हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 11 Jun 2024
  • 10:49 am
pimpri chinchwad

संग्रहित छायाचित्र

वर्ष उलटले तरीही २० गुंठे जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून, नागरिकांचे होताहेत हाल

विकास शिंदे : 
महापालिकेच्या 'फ' क्षेत्रीय कार्यालय इमारतीत अप्पर तहसील कार्यालयात सुरू आहे, पण टपालाची वाढती संख्या, अपुरे मनुष्यबळ, कार्यालयाची अडगळीची जागा, अशा विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या तहसील कार्यालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. मात्र , निगडीतील अप्पर तहसील कार्यालयाला चिखलीमध्ये  सुसज्ज कार्यालय मिळावे म्हणून २० गुंठे जागेची मागणी करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र एक वर्ष लोटूनही या प्रस्तावावर सकारात्मक तोडगा निघाला नाही. अद्याप हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालय स्वतंत्र इमारत, प्रशस्त कार्यालय असावे म्हणून अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींचा पाठबळ मिळत नसल्याने या प्रस्तावाला गती मिळत नाही. स्वतंत्र जागा मिळाल्यास तलाठी कार्यालयासह सुसज्ज तहसील कार्यालयाची निर्मिती होणार आहे. 

महापालिकेच्या निगडी येथील 'फ' क्षेत्रीय कार्यालय इमारतीत पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. दररोज उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आदींसह विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. सातबारा दाखला दुरुस्ती, विविध महसूल सुनावणी, गौण खनिकर्म परवानगी याकरिता देखील तहसील कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते.

महाविद्यालयीन प्रवेशावेळी रहिवासी आणि उत्पन्नाच्या दाखल्यांसाठीची नोंद दिवसाकाठी ७०० आहे. कार्यालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दाखल्यांच्या वाटपाची धीमी गती आहे. कार्यालयात सध्या आठ क्‍लार्क आहेत. 
एक अव्वल कारकून, नायब तहसीलदार आणि अप्पर तहसीलदार एवढ्यावर कार्यालयाच्या कामकाजाचा भार असतो. सद्या या ठिकाणची जागा अपुरी पडत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था नाही. कार्यालयातील दस्तऐवज, साहित्य ठेवायला जागा नाही. त्यामुळे सुसज्ज कार्यालय होण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार झाले आहेत. मात्र त्याला गती मिळाली नाही.  दरम्यान,  चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जवळील २० गुंठे जागेची तहसील कार्यालय इमारत बांधण्यास मागणी करण्यात आली आहे. 

पुणे जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार एकदा बैठक घेऊन शासनस्तरावर कार्यवाही काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मकता दर्शवली होती. मात्र त्याला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळेच हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

२०१३ पर्यंतचे दस्तऐवज हवेली कार्यालयात पूर्वी हवेली तहसील कार्यालयांतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होता. कालांतराने शहराची लोकसंख्येत मोठी वाढ झाली. सध्या २७ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. त्याचा विचार करून निगडी येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र २०१३ पर्यंतचे शहरातील दस्तऐवज अद्याप हवेल तहसील कार्यालयात पडून आहेत. ते घेऊन जाण्याबाबत वारंवार सूचना केल्या जात आहेत. मात्र निगडी येथील कार्यालयाला अपुरी जागा असल्याने ते दस्तऐवज अद्याप आणले नसल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.

चिखली येथे तहसील कार्यालयाची इमारत उभी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. २० गुंठे जागेची मागणी त्यामध्ये केली आहे. या ठिकाणी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयाची निर्मिती केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली असून एकत्र बैठक घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे सांगितले आहे.
-जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest