Pimpri-Chinchwad Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जात आहे. ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान श्री गणेशाचे आगमन, विसर्जन होत असून या कालावधीत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी तीन हजार पोलीस सज्ज राहणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 7 Sep 2024
  • 08:02 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जात आहे. ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान श्री गणेशाचे आगमन, विसर्जन होत असून या कालावधीत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी तीन हजार पोलीस सज्ज राहणार आहेत.

गणेशोत्सव उत्साहात व शांततेने पार पाडावा, कोणताही कायदा, सुव्यस्थेचा प्रश्न निमार्ण होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. १ पोलीस सह आयुक्त, १ अपर पोलीस आयुक्त, ६ पोलीस उपायुक्त, ११ साहाय्यक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, २४५ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, २ हजार

३३८ पोलीस अंमलदार, ५५० होमगार्ड, १ एसआरपीएफ कंपनी, बीडीडीएस पथक, ११ आरसीपी स्ट्रायकिंग एवढा बंदोबस्त सज्ज असणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांनी सर्व गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यादृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिक व गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

असा असेल पोलीस बंदोबस्त

पोलीस सहआयुक्त - १
अपर पोलीस आयुक्त - १
पोलीस उपायुक्त - ६
साहाय्यक पोलीस आयुक्त - ११
पोलीस निरीक्षक - ५३
साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फौजदार - २४५
पोलीस अंमलदार - २३३८
होमगार्ड - ५५०
एसआरफीएफ - १
बीडीडीएस पथक - १
आरसीपी स्ट्रायकिंग फोर्स - ११

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest